News Description
*श्री द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था तर्फे गडचिरोलीत सामूहिक वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे*
गडचिरोली, महाराष्ट्र – विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी ठरणारा सामूहिक वधू-वर परिचय मेळावा 2026 येत्या 3 मे 2026 रोजी (रविवार) संताजी प्रतिष्ठान, पटवारी भवनच्या मागे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विवाह इच्छुकांना सुरक्षित व विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देणे होय. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोफत नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नोंदणीसाठी इच्छुकांना Wadhuwar.com या संकेतस्थळाला भेट देता येणार आहे. तसेच, Wadhuwar Matrimony App डाउनलोड करून स्वतःची नोंदणी स्वतः करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
विशेष आकर्षण म्हणून वधू-वर परिचय पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असून, सहभागींची माहिती त्यामध्ये समाविष्ट केली जाणार आहे. यामुळे इच्छुकांना अधिक पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.
या मेळाव्यात प्रत्यक्ष भेटीगाठीद्वारे परिचय करून घेण्याची संधी मिळणार असून, विवाह जुळवणी प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे
कार्यकमचे प्रमुख पाहुणे
संताजी स्मृती प्रतिष्ठान, गडचिरोली व प्रतिष्ठित नागरिक राहणार आहेत
संपर्क:
8208274671 / 9421854868
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.